Graphic Design Tools मराठीत – Canva आणि इतर मोफत आणि उपयुक्त पर्याय

🎨 Graphic Design Tools मराठीत – Canva आणि इतर मोफत आणि उपयुक्त पर्याय 🎨 Canva म्हणजे काय? आणि त्याचे मोफत पर्याय:- Canva हे एक प्रसिद्ध ऑनलाईन ग्राफिक डिझाईन टूल आहे. यामध्ये आपण मोबाईल किंवा लॅपटॉप वापरून सहजपणे Resume, सोशल मीडिया पोस्ट्स, YouTube थंबनेल, लोगो ब्लॉग बॅनर यासारखे डिझाईन्स तयार करू शकतो. Canva चं बऱ्यापैकी फ्री व्हर्जन उपयोगी असलं तरी त्यामध्ये काही मर्यादा आहेत. Canva चा फ्री मध्ये वापर करून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो ,तरी पण थोडीशी मर्यादा पडतच असते . आपण या पोस्ट मध्ये Canva चा वापर कसा करायचा कोणत्या कोणत्या गोष्टी फ्री भेटणार आणि ज्या फ्री भेटणार नाहीत ते बदल ,इफेक्ट्स आपण कुठून मिळवू शकतो या सर्व गोष्टी आपण या पोस्टमध्ये शिकणार आहोत. ते सर्व पर्याय आपण इथे पाहणार आहोत . चला तर मग करूया सुरुवात ,आपलं पाहिलं पाऊल ग्राफिक डिजाईन मध्ये . 🎨 Canva चा स्टेप-बाय-स्टेप वापर कसा करावा याच मराठीत पूर्ण मार्गदर्शन :- 1)वेबसाईटला भेट द्या:-https://www.canva.com/en_in/ किंवा मोबाईलमध्ये Canva अॅप डाऊनलोड करा. 2)फ...